एसटी कर्मचारी श्रीचरणी ढसाढसा रडले!
चिखली आगारातील १०० कर्मचाऱ्यांची पायी शेगाववारी
Updated: Dec 1, 2021, 21:39 IST
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारून २४ दिवस उलटले आहेत. त्यामुळे सरकारला सद्बुद्धी मिळावी म्हणून चिखली आगारातील शंभराहून अधिक कर्मचाऱ्यांनी आज, १ डिसेंबरला पायी शेगाव वारी करून श्रीचरणी साकडे घातले. गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होताना कर्मचारी ढसाढसा रडल्याने वातावरण भावविभोर झाले होते.
परिवहन मंत्र्यांनी पगारवाढीची घोषणा करूनही कर्मचारी समाधानी नाहीत. जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. राज्यात ४२ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.