डोलारखेड ते माटरगाव रोडवरील झुडूपे अखेर काढली!

बुलडाणा लाइव्हच्या बातमीचा परिणाम
 
जलंब (संतोष देठे पाटील  ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः डोलारखेड ते माटरगाव रोडच्या बाजूची काटेरी झुडूपे मोठ्या प्रमाणात वाढलेली होती. याविषयी बुलडाणा लाइव्हने ३ नोव्हेंबरला बातमी प्रसिद्ध केली होती.
या बातमीची दखल घेऊन बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदाराने २६ नोव्‍हेंबरला सायंकाळी ही काटेरी झुडूपे काढण्याचे काम हाती घेऊन पूर्ण केले. यामुळे अपघात टळण्यास मदत होणार आहे. बुलडाणा लाइव्हने हा प्रश्न मार्गी लावल्याने डोलारखेड येथील ग्रामस्‍थांनी समाधान व्यक्‍त केले.