खामगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत राडा! दारूच्या नशेत दोघांनी कर्मचाऱ्याला झोडपले..

 
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्याला दोघांनी दारूच्या नशेत बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री १० वाजता टीएमसी मार्केट यार्ड मध्ये घडली. 
   प्राप्त माहितीनुसार, स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचारी गजानन नामदेव वाथे बुधवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान बाजार समिती आवारातील पाण्याचा हौद व बाजार समितीची पाहणी करीत होते. त्यांना अक्षय बहूनिया आणि हवेलीया यांचा मुलगा (२४ वर्ष) दोघे रा. बाळापुर फेल हे परिसरात मद्यपान करताना आढळून आले. यावेळी मध्यस्थी करण्यास आलेल्या वैभव समाधान बनसोड याला सुद्धा अक्षय बहुनिया आणि हवेलीया दोघांनी शिवीगाळ केली. तसेच बेदम मारहाण करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. यावेळी झालेल्या झटपटीत वैभव बनसोड याचा मोबाईल पडला. अशी तक्रार पोलिसांत देण्यात आली. तक्रारीवरून पोलिसांनी अक्षय बहूनिया, आणि हवेलीया यांचा मुलगा या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. लोखंडी सरळी मारून दोघांनी जखमी केले. व मोबाईल कोणीतरी उचलून नेला असा आरोप देखील तक्रारीत करण्यात आला आहे.