धक्कादायक; शेतातील झाडाला गळफास लावून जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने केली आत्महत्या! शेगाव तालुक्यातील घटना..

 
शेगाव
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) शेगाव तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर येते आहे. शेतातील झाडाला गळफास लावत जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना आज ८ जुलै रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. 
प्राप्त माहितीनुसार, शिवाजी एकनाथ ढगे (५६ वर्ष रा. खामगाव) असे आत्महत्याग्रस्त शिक्षकाचे नाव आहे. शिवाजी ढगे सकाळी ८ च्या सुमारास जवळच असलेल्या माक्ता शिवारात पोहोचले. त्यांच्या मनात कोणत्या विचारांचा संघर्ष सुरू होता? कोणाला काहीही कळले नाही. माक्ता शिवारातील एका निंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने शिवाजी ढगे यांनी गळफास लावला आणि स्वतःला संपविले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर, जलंब पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बातमी लिहे पर्यंत आत्महत्याचे कारण कळू शकले नाही.