धक्कादायक; २४ तासात खामगावचे दोघे बेपत्ता! युवक म्हणे बाहेरगावी जावुन येतो , युवती म्हणाली मामाच्या घरी जाते! कुणाचाच पत्ता लागला नाही..

 
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गत २४ तासांमध्ये खामगावातून दोघे बेपत्ता झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरच्यांना बाहेरगावी जाऊन येतो असे म्हणणारा २४ वर्षीय युवक अजूनही घरी आला नाही. तर दुसऱ्या घटनेतील २२ वर्षीय तरुणी मामाच्या घरी जाते म्हणून अजूनही पोहचली नसल्याचे समोर आले. दोन्हीही घटना खामगाव तालुक्यात घडल्या आहेत. 
 शिवम विजय घोगरे (वय २४) हा २५ जून रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान बाहेरगावी जातो, असे म्हणत घरातून निघून गेला. त्याच्या कुटुंबीयांनी मोबाईल द्वारे त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही, शिवमचा फोन बंद येत असून त्याच्या कुटुंबीयांनी त्याला नातेवाईकांकडे देखील शोधले तरी तो मिळून आला नाही. अखेर तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली. दुसऱ्या घटनेमध्ये सानिका सुनील चिखलकर (वय २२ रा. विहिगाव) ही स्कूल बॅग,शाळेची कागदपत्रे कपडे असे साहित्य घेऊन २६ जून रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास निघून गेली. मामाकडे जाती असे तिने घरी सांगितले होते. मात्र ती अजून पर्यंत तिच्या मामाकडे पोहोचली नाही. त्यामुळे तिच्या घरच्यांनी देखील खामगाव ग्रामीण पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. या दोन्ही प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मनोज चव्हाण करीत आहेत.