धक्कादायक; खामगावात 'पुणेकरांची' दादागिरी! धारदार शस्त्राने वृद्ध महिलेवर वार..

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) खामगावातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. ग्रामीण पोलीस स्टेशन मधून परत जात असताना वृद्ध महिलेला तिघांनी शिवीगाळ केली, धारदार शस्त्राने वार करत जखमी केले. स्थानिक बस स्थानक परिसरात ही घटना घडली. 
याप्रकरणी शहर पोलिसांनी तिघांविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. प्राप्त माहितीनुसार, अन्नपूर्णा प्रल्हाद म्हारनोर ही वृद्ध महिला सुने सोबत ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गेली होती. यानंतर परत आपल्या घरी शेलोडी येथे दोघी निघाल्या. दरम्यान, स्थानिक बस स्थानक परिसरात गणेश किसन पुणेकर, मंजुळा गणेश पुणेकर, नाना गणेश पुणेकर यांनी दोघी सास सुनेला घेरले. तिघांनी संगणमत करून वृद्ध महिलेला शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकीही दिली. एवढेच नाही तर, मोबाईल हिसकावून नेला. वृद्ध महिलेला धारदार शस्त्राने वार करत जखमी केले. असे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी झालेल्या झटापटीत तक्रारदार महिलेचे मंगळसूत्र कुठेतरी पडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.