धक्कादायक! फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीची इज्जत लुटली; मलकापूर तालुक्यातील घटना...

 
मलकापूर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मलकापूर तालुक्यातून एक धक्कादायक अन् तेवढीच संतापजनक बातमी समोर आली आहे. २४ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीसोबत आधी प्रेमसंबंध प्रस्थापित केले, नंतर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले, यावेळी त्याने तिचे नग्न फोटो काढून ठेवले..नंतर पुढच्या काही दिवसांत त्याने ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीशी वारंवार शारीरिक संबंध ठेवत तिची इज्जत लुटली..
 मलकापूर शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार देण्यात आली. आरोपी २४ वर्षीय तरुणाच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी १७ वर्षांची आहे. घटना डिसेंबर २०२२ ते डिसेंबर २०२३ या कालावधीतील आहे. गेल्या वर्षभरात आरोपी तरुणाने पीडित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नानंतर तर ते करायचं आहे आता केलं तर काय बिघडलं असे म्हणत त्याने तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
    दरम्यान तरुणाने हद्द पार केली. शारीरिक संबंध सुरू असताना त्याने त्याचे फोटो काढले. तरुण सातत्याने शारीरिक संबधाची मागणी करू लागला. त्यामुळे पीडित मुलीने संबंधाला नकार दिला तेव्हा तरुणाने अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली..
  त्यानंतर पुन्हा तरुणाने तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. हा प्रकार सातत्याने सुरू होता. अखेर पीडित मुलीने घडला प्रकार आई वडिलांना सांगितला, त्यानंतर मलकापूर शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणाची तक्रार देण्यात आली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला अटक केली आहे.