धक्कादायक! घरासमोर फिरत असताना चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांच्या टोळीने चढविला हल्ला, फरफटत नेत डोक्यावरील केस मासासहित नेले ओढून !शेगाव शहरातील घटना...
Feb 29, 2024, 17:46 IST
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):शेगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा हल्यात ८ वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाल्याची बातमी आहे. काल २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या या घटनेनंतर आज दुपारी शेगाव शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
Add
शेगाव शहरातील धानुका कंपाऊंड भागात ही घटना घडली होती. कु. रीता कन्हैयालाल चौधरी ही आजीसोबत बाहेर फिरत होती. त्यावेळी अचानकपणे मोकाट कुत्र्याच्या टोळीने चिमुकली रितावर हल्ला चडविला, कुत्र्यांनी तिला १० फुटापर्यंत फरफटत नेले. हल्ला इतका गंभीर होता की, रीताच्या डोक्यावरील केस कुत्र्यांनी मासासह तोडून नेले. मात्र परिसरातील लोकांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले. रिताच्या डोक्यावर गंभीर स्वरुपाची दुखापत झाल्याने , तिला जवळच असलेल्या सराफ यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.पुढील उपचारासाठी तिला अकोला येथील श्रीराम रुग्णालयात नेण्यात आले. आज २९ फेब्रुवारीला तिच्या गंभीर दुखापती वर शस्त्रक्रिया करण्यात आली. तिची प्रकृती सुरक्षित असल्याचे कळते आहे.या भागात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून मोठा धोका निर्माण झाला आहे. शेगाव शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आज मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले.
यावेळी भाजपा नेते शरदसेठ अग्रवाल, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे,माजी नगरसेवक संदिप काळे,मंगेश फुसे,शेगाव शहर व्यापारी परिषदचे अध्यक्ष शेखर नागपाल,ललित खंडेलवाल यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.