खामगाव येथील 'ग्रीनटेक सोल्युशन्स'चा थाटात शुभारंभ संदीप शेळके म्हणाले, सौरऊर्जा साधने स्वस्त झाल्यास शेतकऱ्यांना लाभ!

 
Bxnxj
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एलन मस्क, अदानी, टाटा उद्योग समूह सौरऊर्जा क्षेत्रात उत्तम काम करीत आहेत. शेतीसाठी वीज अत्यावश्यक आहे. सौरऊर्जा साधने स्वस्त झाल्यास शेतकऱ्यांना विजेसाठी त्याचा फायदा होईल, असे प्रतिपादन राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी केले.
खामगाव येथील उदय देशमुख यांच्या 'ग्रीनटेक सोल्युशन्स'चा शुभारंभ १९ नोव्हेंबर रोजी सकाळी थाटात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तुळजाई उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉ. केशव अवचार होते. मंचावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बिपीन गांधी, कालिदास धानवी, संतोषबापू देशमुख, गजाननराव आंधळे, मोहन धोटे पाटील, ऋषी मोरे, प्रमोदबापू देशमुख, शिवाजीराव वानखेडे, अशोकराव ठाकरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 
पुढे बोलतांना संदीप शेळके म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना मुबलक वीज मिळत नाही. रात्री अपरात्री शेतात भिजवण्याससाठी जावे लागते. अनेकदा ही बाब नुकसानकारक ठरते. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाल्यास शेतीची कामे करणे सोयीचे होईल. सौरऊर्जा हा त्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे. शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.  
युवकांनी उद्योगाकडे वळावे
युवकांनी उद्योग, व्यवसायात पुढे यायला हवे. जिल्ह्याचे मागासलेपण दूर होण्यासाठी जसे एमआयडीसी, सिंचन फायदेशीर ठरणार आहे तसेच युवकांचा व्यवसायातील वाढता सहभाग सुद्धा महत्वपुर्ण असणार आहे. कारण छोट्या- मोठ्या व्यवसायामुळे जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागेल. त्यामुळे युवकांनी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा उद्योगाकडे वळावे, असे आवाहन संदीप शेळके यांनी केले.