रेशन दुकानदारांनी घेतली आक्रमक भूमिका, ई-पॉस मशीन तहसील कार्यालयावर केली जमा

 

संग्रामपूर (सप्निल देशमुख: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संग्रामपूर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांवर मागील काही दिवसांपासून ई-पॉस मशीन सर्व्हर डाऊन असल्याने धान्य वाटप करण्यात विविध अडथळे येत आहेत. त्यामुळे जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनेच्या सूचनेनुसार संग्रामपूर तालुका संघटनेने ई-पॉस मशीन तहसीलदार यांच्याकडे जमा करुन दिली आहे. सर्व्हर डाऊन असल्याने धान्य वाटपास अडचणी निर्माण होऊन त्यामुळे ग्राहकांच्या रोषाला दुकानदारास समोरे जावे लागत आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच धान्य कार्ड धारकांना सुद्धा आठवड्यातून तीन ते चार वेळा स्वस्त धान्य दुकानदाराकडे चकरा माराव्या लागत आहेत.

काही दुकानदारांनी आपल्या ई-पॉस मशीनी किळीवर ढेऊन वाजत गाजत पुरवठा विभाग येथून तहसील कार्यालय पर्यंत ई-पॉस मशीन चा अंत्यविधी काढण्यात आला आहे. ई-पॉस मशीन जमा करतांना राशन दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष केशव दाने, तालुका उपाध्यक्ष कमरोद्दीन मिर्झा, गणेश मारोडे, शरद कोरडे, राजू ठाकूर, गणेश पाटील, विलास चिकटे, राजीकोद्दीन मिर्झा, अनंतराव महाले, वैभव खराटे, पुरषोत्तम अढाव, सुनील मेगे इतर स्वस्त धान्य दुकानदार यांची उपस्थिती होती.