मोताळा तालुक्यात रांगोळीतून साकारली राम जन्मभूमी! पाहून तुम्हीही म्हणाल, व्वा!
Jan 19, 2024, 18:42 IST
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)मोताळा तालुक्यातील शेंबा येथील गुप्तेश्वर आश्रमात देवारावण चवरे यांनी रांगोळीतून श्रीराम जन्मभूमी रेखाटली. तब्बल ३० फुट उंचीची ही रांगोळी, पंचक्रोशीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली. हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून चवरे यांनी १५ जानेवारीला ही रांगोळी रेखाटली होती. रांगोळीतील राम मंदिर पाहण्यासाठी परिसरातून एकच गर्दी उसळली होती.
रांगोळी साकार करण्यासाठी, एकूण ७० किलोची रांगोळी वापरण्यात आली असल्याची त्यांनी सांगितले आहे. इतकचं नाही तर श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या आधी नांदुरा येथील हनुमंत रायाच्या भव्यमूर्ती समोर विश्वविक्रमी रांगोळी रेखाटनार असल्याचे चवरे यांनी स्थानिक वृत्त माध्यमाला सांगितले आहे. ती रांगोळी तब्बल १०८ फूट उंचीची असणार आहे. अशाप्रकारे राम भक्तीचा अनोखा प्रत्यय पाहायला मिळतोय, सद्यस्थितीत संपूर्ण भारतदेश सजत आहे, श्रद्धास्थानी नयनरम्य वातावरणाची निर्मिती करण्यात येतेय.