पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज १४ ला खामगावात!
गुणवंतांचा सत्कार करणार
Nov 11, 2021, 10:57 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत भूषणराजे होळकर १४ नोव्हेंबरला खामगावमध्ये येणार आहेत.
सकाळी ११ वाजता त्यांच्या हस्ते खामगाव बाजार समितीत धनगर समाजातील गुणवंतांचा सत्कार सोहळा होणार आहे. या वेळी धनगर समाजाच्या इतिहासावर मान्यवरांची भाषणेही होणार असून, जिल्ह्यातील समाजबांधवांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन शरद वसतकार, रवींद्र गुरव, अशोकराव हटकर यांनी केले आहे.