मलकापूरात पोळा सणावर विरजण! बैल धुण्यासाठी गेलेले दोन शेतकरी बुडाले...
Sep 2, 2024, 19:43 IST
मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यभरात आज सगळीकडे पोळा सण उत्सवात साजरा केला जात असतानाच मलकापूर तालुक्यातून दुःखद बातमी समोर येत आहे. बैल धुण्यासाठी तलावावर गेलेले दोन शेतकरी तलावात बुडाले. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. देवधाबा येथे ही घटना घडली.
प्रवीण काशिराम शिवदे (३२,रा. देवधाबा, ता.मलकापूर) व गोपाल प्रभाकर वांगेकर(२९, रा. हरणखेड, ता.मलकापूर) अशी मृतक शेतकऱ्यांची नावे आहेत. आज सकाळी बैल धुण्यासाठी तलावावर गेल्यानंतर दोन्ही शेतकरी पाण्यात बुडाले..पाणी आणि गाळ असल्यामुळे घटनास्थळी उपस्थित शेतकऱ्यांना बचाव कार्य करताना अडचणी आल्या. महसूल प्रशासनाला माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले, दुपारी दोन्ही शेतकऱ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे देवधाबा व हरणखेड गावावर शोककळा पसरली आहे.