पालकांनो मुलांना सांभाळा ५ वर्षाच्या एकुलत्या एक सुरजने खेळता - खेळता जीव गमावला!;खामगाव शहरातील घटना

 

खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) घरातील लहान मुलांवर आपले थोडे जरी लक्ष हटले तर काय होऊ शकते? याची प्रचिती खामगाव शहरातील अभिमन्यू डाबेराव यांना आली आहे.

अभिमन्यू डाबेराव यांचा पाच वर्षीय एकुलता एक चिमुकला सुरज हा घरातील खिडकीत लावलेल्या कुलरजवळ खेळत होता. सुरजचा खेळता - खेळता घरच्या खिडकीत लावलेल्या कुलरला स्पर्श होऊन त्याला कुलरचा शॉक लागला. त्यामध्ये सुरज डाबेराव (वय वर्ष ५ रा - गोपाळनगर, खामगाव) याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना  ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली आहे. शॉक लागल्यानंतर गंभीर झालेल्या सुरजला ताबडतोब खामगावच्या सिल्वरसिटी हॉस्पिटलमध्ये नेले होते. मात्र तो पर्यंत सुरजने आपला जीव गमावला होता. सुरज आपल्या आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याला एक बहीण होती, त्यामुळे सुरजच्या जाण्याने गोपाळनगर भागात शोकाकुल पसरला आहे.