शेतकऱ्यांना फसवणाऱ्या पिकविमा कंपन्यांवर; फसवणुकीचे गुन्हे दाखल करा!खामगावच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन.!!

 
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी २०२१-२२ मध्ये पिकविमा काढला होता. शेतकऱ्यांचा पिकविमा शासनाने मान्यही केला. मात्र ज्यांनी जेवढा विमा काढला तेवढीही रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नाही. शेतकरी बांधवांची फसवणूक झाली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाला आहे. या करिता २९ नोव्हेंबर रोजी खामगावच्या तालुका कृषी अधिकारी यांना तसे निवेदन देवून पिकविमा कंपन्यांवर फसवणुकीचर गुन्हे दाखल करा अशी मागणी अमोल विश्वासराव टिकार, धम्मपाल विक्रम नितनवरे यांनी केली आहे.