ओमिक्रॉन... हायरिस्क देशांतून खामगावात परतले ६ जण!

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा नवा भयंकर प्रकार असलेल्या ओमिक्रॉन विषाणूचा प्रसार झालेल्या देशांतून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांवर प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे. गेल्या ७ दिवसांत अशा हायरिस्क देशांतून खामगाव शहरासह तालुक्‍यात ६ नागरिक परतले असून, त्‍यांची माहिती घेऊन आरोग्य विभागाने तपासण्या सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.
४ डिसेंबरला ३ जण खामगाव शहरात तर त्‍यापूर्वी २८ नोव्‍हेंबरला ३ जण सुटाळा खुर्द येथे परदेशातून आल्याची नोंद आरोग्‍य विभागाकडे झाली आहे. त्‍यांचे परदेशातील रिपोर्ट निगेटिव्‍ह आले आहेत. मुंबई येथेसुद्धा त्‍यांच्या तपासण्या झाल्या होत्या, तिथेही रिपोर्ट निगेटिव्‍ह आले आहे. आता गावी परतल्याने पुन्हा त्‍यांची आरटीपीसीआर टेस्‍ट केली असून, त्‍याचा अहवाल येणे बाकी आहे, असे सूत्रांनी सांगितले.