Amazon Ad

अहो पक्का भामटा हे त्यो! ३ वर्षाआधी सिंदखेडराजा तालुक्यातील विरपांग्रा गावातही प्रगटला होता; भोळ्या भक्तांना लुबाडले होते; मिलन चव्हाण यांनी सांगितलं "तो" किस्सा !

वाचा दोन दिवसाआधी खामगावात गजानन महाराज असल्याचे भासवत भक्तांना गंडवणाऱ्याने विरपांग्रा गावात काय केलं होत..; महिलांना द्यायचा आशीर्वाद, पुरुषांना म्हणायचा बाहेर व्हा...
 
बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): १ ऑक्टोबरच्या संध्याकाळी खामगाव शहरातील सुटाळपुरा भागात एका घरी श्री संत गजानन महाराज प्रकट झाल्याची वार्ता पसरली होती. हुबेहूब संत गजानन महाराजांसारखा दिसणारा अवतार, पोषाखही तसाच अन् बसण्याची पद्धत, हसण्याची पद्धतही संत गजानन महाराजांसारखीच.. मग काय भक्तांची एकच झुंबड उडाली, दर्शनासाठी गर्दी झाली, भक्तांनी महाराजांची आरती केली, पूजा केली..महाराज कुणाला फोटो काढू देईना..काही वेळाने एका भक्ताने कथित महाराजांच्या सांगण्यावरून त्यांना खामगाव रेल्वे स्थानकावर सोडले..आता जातांना मागे पाहू नकोस असे त्या भक्ताला सांगून कथित महाराज रेल्वे स्टेशनवरून गायब झाले..दरम्यान हे वृत्त जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात पसरले..विविध चॅनल वर देखील खामगावात संत गजानन महाराज प्रकट झाल्याच्या बातम्या झळकल्या..बुलडाणा लाइव्ह ने मात्र आपले वेगळेपण जोपासत अंधश्रद्धा पसरवण्याऐवजी या प्रकरणाच्या मुळाशी जात खामगावात संत गजानन महाराज म्हणून प्रकटणारा लातूर जिल्ह्यातील घुग्गी (सावंगी) येथील रामराव शेषराव बिराजदार असल्याचे समोर आणले. दरम्यान बुलडाणा लाइव्ह च्या या वृत्तानंतर आता या रामराव शेषराव बिराजदारचे अनेक कारनामे समोर येत असून तो पक्का भामटा असल्याचे समोर येत आहे. भोळ्या भाबड्या भक्तांच्या श्रध्देचा गैरफायदा घेत त्याने यापूर्वी अनेकांना गंडवल्याचे बुलडाणा लाइव्हच्या निदर्शनास आले आहे. ३ वर्षापूर्वी तो सिंदखेडराजा तालुक्यातील विरपांग्रा गावात देखील प्रकटला होता,त्याचा किस्सा वीरपांग्रा येथील मिलन चव्हाण यांनी बुलडाणा लाइव्ह सोबत शेअर केला आहे, स्थानिक गावकऱ्यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला.
    
 त्याचे झाले असे की, ३ वर्षाआधी विरपांग्रा येथील संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात एक महाराज स्थानिकांना दिसले. त्यावेळी महाराज पांढऱ्या सोवळ्यात होते.. ही वार्ता पसरताच गावातील भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती, कुणी त्यांना संत तुकाराम महाराज तर कुणी संत गजानन महाराज संबोधत होते. त्या कथित महाराजांनी त्यांच्याजवळचे एक भांडे समोर ठेवले होते, त्यात भाविक दक्षिणा टाकत होते. कुणी ५००, कुणी १००० अश्या स्वरूपात मोठी रक्कम जमा झाली होती. यावेळी हे कथित महाराज कुणाला फोटो काढू देत नव्हते..असे मिलन चव्हाण यांनी सांगितले.
  दरम्यान या प्रकारानंतर महाराज एका भक्ताच्या घरी गेले. त्या घरात महाराज फक्त महिला भाविकांना दर्शन देत होते. पुरुषांना बाहेर व्हा म्हणत होते. आपण स्वतःही कुटुंबियांच्या आग्रहावरून महाराजांना श्रध्देने ११०० रुपये दिल्याचे चव्हाण यांनी सांगितले. त्यानंतर महाराजांनी दुसरबीडला सोडायला सांगितले, आपण आपल्या दुचाकीवरून त्यांना दुसरबीड येथे नेले, तिथे संत गजानन महाराज मंदिराजवळ असलेल्या एका घरी ते जाऊन आले, त्यानंतर दुसरबीड समोरील जंगलाच्या रस्त्याने महाराज पळून गेले,आम्ही त्यांच्या मागे जात होतो तर ते आम्हाला दगड मारत होते असे मिलन चव्हाण यांनी सांगितले..खामगाव येथे संत गजानन महाराज प्रकटल्याच्या बातमीत त्या कथित महाराजांचा फोटो झळकल्यानंतर हाच महाराज आमच्या इथेही पक्रटला होता असे चव्हाण यांनी बुलडाणा लाइव्ह शी बोलताना सांगितंले.