शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा राष्ट्रवादी आक्रमक, प्रसेनजीत पाटिल यांनी तहसीलला ठोकले कुलुप...

 
जळगाव
जळगाव जामोद(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आज तहसिल कार्यालयात अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी आयोजित विशेष शिबिराला तहसीलदार व कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचे दिसून आले. राज्य सरचिटणीस प्रसेनजीत पाटील यांनी तहसीलदार कक्षाला कुलूप ठोकल्याने एकच खळबळ उडाली.

 हद्द

जुलै 2023 मध्ये जळगाव जामोद, संग्रामपुर महापुरा मध्ये शेतकर्याच अतोनात नुकसान झाले. हजारो हेक्टर जमीन खरडून गेली, पिकांच नुकसान झाल. अश्या परिस्थितीत हवालदिल झालेल्या शेतकर्यांना शासन/प्रशासना मदत मिळवून देण्यासंदर्भात प्रचंड आशा होत्या. परंतु नुकसान झाल्यानंतर तब्बल जवळपास 8 महिन्यांनी नुकसानीच्या याद्या जाहीर झाल्या. त्यामध्ये ज्यांच खरोखर नुकसान झाल, जमिनी खरडून गेल्या त्यांना मदतीपासून वंचित ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला. त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसेनजीत पाटिल यांच्या नेतृत्वात तसेच विविध पक्ष संघटना यांनी आंदोलने केली. 

त्यानंतर 8 दिवस आधी तहसील कार्यालयाने 1 नोटीस काढून तक्रारकर्त्या शेतकऱ्यांसाठी 15/2/2024 पासून महसूल मंडळ नुसार तक्रारी निवरण्यासाठी कॅम्पचे आयोयन केले. आज 15 फेब्रुवारी ला वडशिंगी महसूल मंडळाला बोलावलेलं असतांना तहसीलदार यांच्यासह सर्व कर्मचारी गायब होते, शेकडो शेतकरी आले असतांना अधिकारी नसल्यामुळे शेतकरी प्रचंड आक्रोशात होते. अश्या परिस्थितीत शासन/प्रशासनाचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचे नेते प्रसेनजीत पाटिल यांनी तहसील कार्यालयाला कुलुप ठोकले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर, वंचितचे सुनिल बोदडे, सुहास वाघ, अरुण निंबोळकर, आशिष वायझोडे, राजेश वाघ यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.