नांदुरा परिसरात पुन्हा मर्डर! दगडाने ठेचले, डोक्याच्या कवटीचे केले दोन भाग!अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल ; पोलिसांची घटनास्थळी भेट
Mar 4, 2024, 08:32 IST
नांदुरा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नांदुरा ते मोताळा मार्गावरील शेतशिवारात एका अनोळखी ईसमाचा खुन झाल्याची खळबळजनक घटना रविवार दि. ३ मार्च रोजी ऊघडकीस आलेली आहे.नांदुरा पोलीस प्रशासनाला मिळालेल्या प्रथम खबरी नुसार नांदुरा ते मोताळा मार्गावरील माऊली पेट्रोलपंप परीसराजवळील लोणवडी शेतशिवारात अनोळखी ईसमाचे मृतशरीर पडल्याची खबर मिळताच नांदुरा ठाणेदार यांनी वरीष्ट अधिकार्यांना घटनेची माहीती देऊन घटनास्थळ गाठले.
मोताळा शहराकडे जाणार्या मार्गावरील रस्त्यापासुन १०० मीटर अंतरावर शेताचे धुर्यावर एका अनोळखी तरुणाचे प्रेत दिसुन आलेले असून मृतकांचे डोक्यावर दगडाने ठेचून, चेहर्यावर मारहाण केल्यामुळे चेहरा रक्तबंबाळ जखमी तथा गळा आवळुन खून केल्या सारखे दिसून आलें आहे.
नांदुरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिस अधीक्षक सुनील कडासने , अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, ऊपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवली, मलकापुर यांनी भेट देऊन तपास बाबत मार्गदर्शन केले. मृतकाचे हातावर हर्षल असे नाव दिसुन आलेले आले.
पोलिसांचे ओळख पाठविण्याचे आवाहन
ठाणेदार विलास पाटील यांचे मार्गदर्शनात आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी कुणाला अधिक माहीती असेल तर 8888437888 या क्रमांकावर संर्पक करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. माहीती देणार्यांचे नांव गुप्त ठेवण्यात येईल असे पोलिसांनी कळविले आहे.