मराठ्यांचे वादळ आज खामगावात! विराट सभेला मनोज जरांगे पाटील करणार संबोधित; सभेची जय्यत तयारी! पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात! वाचा सभेचे कसे आहे नियोजन...

 
Duhh
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. आज, मनोज जरांगे पाटील यांची मलकापूर आणि खामगाव येथे सभा आहे. मनोज जरांगे पाटील आज शेगावला मुक्कामी थांबणार असून उद्या ते अकोला जिल्ह्यात जाणार आहे. आज मलकापूर आणि खामगाव येथे होणाऱ्या दोन्ही सभांची जय्यत तयारी करण्यात आली असून या सभेला लाखोंचा जनसागर उसळण्याची शक्यता आहे. परिणामी बुलडाणा जिल्हा पोलिसांकडून चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यावर लक्ष ठेवून आहेत.
 खामगावच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानावर आज सायंकाळी ४ वाजता मनोज जरांगे यांची सभा होणार आहे. याकरिता सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य स्टेज उभारण्यात आली असून अतिशय काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. मैदानात प्रवेश करण्यासाठी तीन प्रवेशद्वार असणार आहेत. यात १ आणि ३ नंबरच्या प्रवेशद्वारातून पुरुषांना तर २ नंबरच्या प्रवेशद्वारातून महिला आणि पत्रकारांना प्रवेश देण्यात येणार आहे.