खामगावात मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा समाज आक्रमक!;साखळी उपोषणाला सुरवात..

 
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):मराठा आरक्षणासाठी सद्या राज्यभर व्यापक लढा लढला जात आहे. मनोज जरांगे यांनी हा लढा सुरू केला आहे.सरकारने ४० दिवसांचा वेळ घेऊनही मराठा आरक्षणासंदर्भात कुठलाही निर्णय घेतला नाही. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. 
या उपोषणाला राज्यभरात प्रतिसाद मिळत आहे. मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ खामगावात टॉवर चौकात २९ ऑक्टोबर पासून सकल मराठा समाजाच्या वतीने आमरण, साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. काल,सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करून सकल मराठा समाज बांधव संतोष येवले,प्रवीण कदम,शंकर खराडे,शिवाजी जाधव,कडूचंद घाडगे तसेच उपस्थित इतर समाज बांधवानी साखळी उपोषण करण्यास सुरुवात केली आहे.