लाखोंचा चुना लावणारा, तब्बल 3 वर्षानंतर पोलिसांच्या तावडीत !मलकापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई

 
Police
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : २०२१ साली नांदुरा तालुक्यातील एकाची ६ लाखांपेक्षा अधिक ऑनलाइन प्रकारे फसवणूक झाली होती. खाजगी संस्थेतून कर्ज मिळवून देतो असे सांगून एका भामट्याने पैसे उकळले होते. त्याचाच शोध लागला आहे. वसंत कुमार साहू असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला आज २० जानेवारीला अटक केली.
तांत्रिक विश्लेषणाच्या जोरावर पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपीचा शोध घेण्यासाठी मलकापूर ग्रामीण पोलिसांच्या साथीला ठाणे येथील पोलिस पथक गठीत होते. नांदूर येथील एका व्यक्तीला कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देऊन लाखो रुपये त्यांच्याकडून उकळण्यात आले होते. तशी तक्रार ग्रामीण पोलिसात दाखल होती. दरम्यान आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात तसेच ठाणेदार संदीप काळे यांच्या नेतृत्वात हेड कॉन्स्टेबल सचिन दासर, गणेश सूर्यवंशी, संदीप राखोंडे, वृषाली अशी टीम गठीत करण्यात आली होती. मागील तीन दिवसात कसोटीने शोध घेऊन आरोपीचा शोध लागला. आरोपी वसंत कुमार साहू मूळचा ओडिसा राज्यातील आहे. मात्र तो मुंबईतील कुर्ला भागात राहत होता. ऑनलाइन भामटेगिरीतून त्याने फसवणूक केली आहे. त्याच्या कॉल सेंटरचा पर्दाफाश झाल्याचे पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकातून सांगितले. पोलिसांना त्याच्याकडून १९ मोबाईल फोन्स,०३ लॅपटॉप,०१ कलर प्रिंटर यासह अन्य असा एकूण १ लाख २५ हजारांचा मुद्देमाल प्राप्त झाला. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्यात येण्याची शक्यता वर्तवली जातेय