खामगांव तालुक्यातील निळेगावात शनिवारपासून बत्ती गुल! नागरिक परेशान, विद्यार्थी हैराण! वीज कर्मचारी म्हणतात....
Feb 29, 2024, 09:42 IST
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव तालुक्यातील निळेगावात शनिवार पासून विद्युत पुरवठा ठप्प झाल्याने नागरिक परेशान,विद्यार्थी हैराण झाले आहेत.

Add. 👆
जिल्ह्यात अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे, व वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यातील काही ठिकाणचा विद्युत पुरवठा सुरळीत झाला आहे.मात्र खामगाव तालुक्यातील कोलरी सबटेशन अंतर्गत येत असलेल्या निळेगावात शनिवार पासून वीज नसल्याने नागरीक परेशान झाले आहेत.विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय निर्माण होत असल्याने हैराण झाले आहेत. नागरिकांनी वीज कर्मचारी यांना विचारणा केली मात्र वीज कर्मचारी म्हणतात लवकरच येईल. पण अजूनतरी विजेचा पता नाही