न्याय नाही तर मरण तरी द्या!
खामगावच्या २६९ एसटी कर्मचाऱ्यांची सरकारकडे परवानगी!
Dec 29, 2021, 10:34 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः संपावर तोडगा निघण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने हताश झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा मरणाची परवानगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागितली आहे. खामगाव आगारातील २६९ कर्मचाऱ्यांनी तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
तुटपुंजे वेतन आणि मानसिक त्रासामुळे आजवर अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली केली आहे. एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यासाठी सुरू असलेला लढा शासनाकडून बेदखल करण्यात येत आहे. न्याय मागण्या मान्य होत नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या मनात आत्महत्या करण्यासारखे विचार येत आहेत. मात्र आत्महत्या करणे कायद्याने गुन्हा असल्याने स्वेच्छा मरणाची परवानगी देण्यात यावी, असे निवेदनात एसटी कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.