खामगाव तालुक्याला अवकाळीने झोडपले! विजेच्या तारा, पोल कोसळल्या! अनेक गावांतील बत्ती गुल

 
road
खामगाव( भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव तालुक्यात १० एप्रिलच्या रात्री अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. सोसाट्याच्या वारा, मुसळधार पाऊस आणि गारपीटीमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.
 

 तालुक्यातील चितोडा, हिंगणा, विहिगाव, पाळा या गावांना गारपिटीचा मोठा फटका बसला. जोरदार वादळामुळे अनेक झाडे उन्मळून पडली. आवार येथील रस्त्याच्या कडेला लागून गेलेली मुख्य विद्युतवाहिनी कोसळून गेल्याने अनेक गावांतील वीज गेल्या १८ तासांपासून गायब आहे. काढणीला आलेला गहू,कांदा, टरबुल , मका या पिकांचेही वादळ आणि गारपीट झाल्याने नुकसान झाले आहे.