नांदुऱ्यात सीआरएफ तुकडी, ७ पोलीस अधिकारी, १०१ पोलीस कर्मचारी हातात बंदुका, दांडूका घेऊन उतरले रस्त्यावर! कारण स्पेशल ...
Mar 16, 2024, 13:19 IST
नांदुरा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आगामी लोकसभा निवडणुक तसेच शिवाजी महाराज जयंती, रमजान , होळी रंगपंचमी हे उत्सव शांततेत पार पाडण्याचेदृष्टीने नांदुरा शहरातुन आज शुक्रवारी फ्लॅग मार्च काढण्यात आला.
टाऊन हॉल,सुभाष चौक, मधुबन चौक, डॉक्टर राखुंडे यांचा दवाखाना, वाकोडे एसटीडी, आठवडी बाजार, घास मंडी, सरकारी दवाखाना मागून छोटी मज्जिद,पेठ मोहल्ला कुरेशी मज्जिद, जैन यांचे घर ,जामा मस्जिद -दरबार गल्ली, मोतीपुरा मज्जिद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे काढण्यात आलेल्या या फ्लॅग मार्चचा समारोप टाऊन हॉल येथे करण्यात आला. फ्लॅग मार्चमध्ये सीआयएएसफफ चे अधिकारी एन. व्ही. सिब्बु 3 अधिकारी व नांदुरा पोलीस ठाण्याचे 66 कर्मचारी सहभागी झाले. पोलीस स्टेशन नांदुरा चे पोलीस निरीक्षक विलास पाटील , 2 अधिकारी व 35 कर्मचारी , 15 होमगार्ड असे एकुण 7 अधिकारी व 101 कर्मचारी , 15 होमगार्ड सहभागी झाले .