खामगांव तालुक्यातील अटाळी, विगाव येथे तुफान गारपीट! वादळी वाऱ्यामुळे कोसळले झाड, शेतकऱ्याच्या सहा बकऱ्या ठार...
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) कालपासून बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. अचानक झालेल्या पावसामुळे व तुफान गारपिटीने जिल्ह्यातील बहुतांश भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आज बुधवारी देखील अवकाळी पावसाने खामगाव तालुक्यात हजेरी लावली. दरम्यान, अटाळी, विगाव या गावात झालेल्या तुफान गारपीटीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळल्याने अटाळी येथील एका शेतकऱ्याच्या सहा बकऱ्या ठार झाल्या आहेत.
Advt
दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास जोऱ्याच्या वादळी वारा सुटला होता. अटाळी येथील अल्पभूधारक शेतकरी अकलाज देशमुख यांच्या शेतातील निंबाचे झाड यादरम्यान कोसळले. इतका कमलीचा हा वारा वाहत होता. गारपीट सुरू होती त्यामुळे बचावासाठी झाडाखाली बकऱ्या उभ्या होता. परंतु अचानक वादळी वाऱ्यामुळे झाड खाली कोसळले, यामध्ये झाडाखाली उभ्या असलेल्या बकऱ्यांचा दबून मृत्यु झाला. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, शासनाने लक्ष देवून तात्काळ मतद जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.