त्याला वाटल ते भितील..म्हणून आठवडी बाजारात तलवार घेऊन फिरत होता! पोलिसांनी चांगलीच मस्ती उतरवली! जळगाव जामोदची घटना

 
जळगाव जामोद( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकांमध्ये दहशत निर्माण व्हावी, लोकांनी आपल्याला घाबराव असं जळगाव जामोदच्या अविनाश ला वाटायचं..त्यासाठी भर बाजारात हातात तलवार घेऊन तो फिरायचा..पण शेरास सव्वाशेर असणाऱ्या जळगाव जामोद पोलिसांनी त्याची मस्ती चांगलीच उतरवली..
 

अविनाश दिलीप जाधव(२७) हा काल,१३ सप्टेंबरच्या रात्री हातात तलवार घेऊन जळगाव जामोद च्या आठवडी बाजारात फिरत. लोकांना धाक दाखवत होता. जळगाव जामोद पोलिसांना प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहून अविनाशची बोलतीच बंद झाली. पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या अविनाशला पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले, पोलिसी खाक्या दाखवताच त्याची मस्ती चांगलीच उतरली. याप्रकरणी त्याच्याविरोधात बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी  गुन्हा दाखल केला आहे.