"गोरसेने"ने खामगावात सरकारच्या प्रतिमेला जोडे मारले; कारण....

 
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गोरसेने'च्या वतीने नागपूर येथे दिलेले निवेदन सरकारमधील एकाही मंत्र्याने न स्वीकारल्याने खामगावात सरकारच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
झाले असे की, राष्ट्रीय गोरसेना अध्यक्ष प्रा संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात गोरसेना, सकल विमुक्त जाती ( अ ) यांच्या वतीने ८ डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात विमुक्त जाती ( अ ) मधील अवैध घुसखोरी थांबविणे संदर्भात जनआक्रोश मोर्चा काढून मंत्री मोहदय यांना निवेदन द्यायचे होते. अतुल सावे ( बहुजन कल्याण मंत्री ) यांनी निवेदन स्वीकारण्यासाठी ३.३० वाजताची वेळ दिली होती. मात्र मंत्री अतुल सावे हे विधिमंडळात हजर असताना सुद्धा त्यांनी निवेदन स्वीकारण्यासाठी वेळ दिला नाही. सरकारच्या इतर कोणत्याही मंत्र्यांने वेळ दिला नाही. याकरिता आज १६ डिसेंबर रोजी खामगावात गोरसेनेच्या वतीने सरकारच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करण्यात आले आहे.