खामगावात अग्नितांडव! टिळक मैदानावरील दुकाने जळून खाक!

 
फायर
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आगीमुळे खामगावच्या टिळक मैदानावरील दुकानांना भीषण आग लागली आहे. यामध्ये तीन ते चार दुकाने जळून खाक झाले आहेत.
खामगाव शहरातील टिळक मैदानावर असलेल्या एका कटलरीच्या दुकानाला आज,४ ऑक्टोबरच्या सकाळी ११ वाजताच्या दरम्यान आग लागली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात दुकानाचे नुकसान झाले आहे.दुकानातील सर्व सामान जाळून खाक झाले आहे.या आगीमुळे आजूबाजूला असलेल्या दुकांनानाही आगीचा फटका बसला आहे. नेमकं ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागली की आणखी दुसऱ्या कारणामुळे याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क सुरू आहेत. वृत्त लीहिस्तोवर खामगाव, शेगाव नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयन्त चालू आहेत.