मोताळ्यात भीषण अपघात; दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या! तिघे जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक!

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मोताळा शहरात मलकापूर रोडवर दोन दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली.आज १४ डिसेंबरच्या दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. 

दुचाकीस्वार शेख समद शेख अमद व जुबेर शेख बाबूलाल ( रा.मुक्ताईनगर) दोघे बुलडाण्याच्या दिशेने निघाले होते. दुसऱ्या दुचाकीवर असलेले सिंधुबाई देविदास बोरसे आणि संतोष बोरसे मलकापूर च्या दिशेने जात होते. मात्र रस्त्यातच मोताळा शहरानजिक दोन्ही दुचाकी समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात घडला. अपघातातील जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. गंभीर जखमी संतोष बोरसेला छ. संभाजीनगर येथे हलवण्याच्या हालचाली सुरू आहेत.