खामगावात बोरी आडगावच्या शेतकऱ्यांनी काढला ट्रॅक्टर मोर्चा! तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी..

 
Kham
खामगांव (भागवत राऊत: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आज, वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुपारी १२ वाजता खामगावात शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा घडकला.गत आठवड्यापासून खामगांव तालुक्यातील बोरी आडगाव येथे तालुका दुष्काळग्रस्त घोषित व्हावा या प्रमुख मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मात्र अद्यापपर्यंत कुठलाही निर्णय झाला नाही, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी थेट ट्रॅक्टर मोर्चा काढला. मोर्चा खामगाव येथील उपविभागीय कार्यालयावर धडकला.
मोर्चात एकूण ५० पेक्षा अधिक ट्रॅक्टर होते, त्यामध्ये बोरी आडगाव परिसरातील शेकडो शेतकरी जमले. बोरी आडगाव ते खामगाव असा ३० किमी चा प्रवास मोर्चाने केला. विशेष म्हणजे वृध्द शेतकऱ्यांनी उस्फुर्तने सहभाग दर्शविला. यावेळी खामगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित झालाच पाहिजे, अश्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. बोरी आडगाव येथे २७ डिसेंबर पासून शेतकऱ्यांचे उपोषण सुरू आहे. त्याठिकाणी राजकिय नेत्यांनी उपस्थिती लावत आहेत. मात्र अद्याप प्रशासनाने उपोषणाची दखल न घेतल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. या आंदोलनात आता पुढे काय काय होणार? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे..