BREAKING खामगाव कृषी उत्पन्न समितीत सोयाबीन ला कमी भाव भेटला म्हणून शेतकऱ्याचा रुद्रावतार..! हातात पिस्तूल घेतले अन् कोयता....व्हिडिओ व्हायरल

 
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीनला कमी भाव भेटला म्हणून शेतकऱ्यांने रुद्रावतार धारण केला...हातात कोयता आणि पिस्तूल घेत त्याने शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली..
 पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील शेतकरी रवींद्र महानकर यांनी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन विक्रीसाठी आणले होते. मात्र सोयाबिनला कमी दर मिळाल्याने महानकर चांगलेच संतापले. बाजार समितीच्या बाहेर त्यांनी उघड्यावर सोयाबीन टाकले, हातात कोयता आणि पिस्तूल घेत त्यांनी शासनाच्या धोरणाविरोधात नारेबाजी केली. यावेळी बघ्यांची एकच गर्दी जमली.
   पोलिसांनी घटनास्थळी पोहचून शेतकरी महानकर यांना ताब्यात घेतले. शेतकऱ्यांच्या हातात दिसत असलेली पिस्तूल सदृश्य वस्तू एअर गन असल्याचे पोलिसांनी सांगितले. ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पुढील कारवाई सुरू आहे.