कारला धक्का लागला म्हणून कुणी असं करत का? शेगावात तर न्यारच घडल...चक्क....
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):बोलेरो पिकअप चा कारला धक्का लागला 'अन' कार वाला चक्क बोलेरो पिकअप बळजबरीने घेवून गेल्याची धक्कादायक घटना शेगाव तालुक्यातील तरोडा टोलनाक्यावर घडली आहे.
जाहिरात👆
झाले असे की, आपली एम एच २१ बी एच - ५२१५क्रमांकाची बोलेरो पिकअप मालवाहू गाडी घेवून शेख सलमान शेख लुकमान (वय २३ वर्ष, रा. अन्या ता - भोकरदन जि - जालना) हा अकोला येथे भाजी मंडी मधून भाजीपाला विक्री करून घरी परत जात होता. याचवेळी शेख सलमान हा १० आक्टोबर रोजी रात्री २ वाजताच्या दरम्यान बाळापूर हायवेवरील ग्राम तरोडा (ता - शेगाव जि - बुलडाणा) येथील टोलनाका क्रॉस करत होता.तेव्हा वेणू कंपनीची कार क्रमांक एम एच - ३० बी एल ५१४३ ही कार लेनकडे येतांना बोलेरो मालवाहू गाडीचा त्या कारला धक्का लागला. कारमधील १) गौरव अरुण गोलाईत २) मोहन सदाशिव ताले ३) आशिष रोडे ४) आदित्य पिसाळ (सर्व रा.अकोला) यांनी कारला धक्का लागल्याच्या कारणारे बोलेरो पिकअपचा ड्रायव्हर शेख सलमान याला शिवीगाळ करून,चपटा, बुक्यांनी मारहाण केली. अंदाजे किंमत तीन लाख किंमत असलेली बोलेरो पिकअपची चावी जबरदस्ती हिसकावून गाडी चोरून नेली आहे.अशी तक्रार आज १० आक्टोबरला रोजी शेख सलमान याने खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.पुढील तपास सपोनि प्रफुल्ल गाडेकर हे करीत आहेत.