उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस "श्री गजानना" चरणी नतमस्तक!

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज ०९ डिसेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. सर्वप्रथम संतनगरी शेगावात दाखल झाल्यानंतर दुपारी २.२० वाजता त्यांचे संत श्री गजानन महाराज मंदिर येथे आगमन झाले. यावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी संत श्री गजानन महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले.
 
त्यांनतर दुपारी ३.०० वाजेच्या सुमारास श्री. संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय येथील आयोजित विदर्भ प्रदेश अभिवक्ता परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमास उपस्थित होते. त्यानंतर सायंकाळी सव्वाचार वाजता ते हेलिकॉप्टरने अकोल्याकडे मार्गस्थ झाले. दरम्यान बुलढाणा पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.