गण गण गणात बोते च्या गजरात श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान! २७ जूनला पोहचणार पंढरीत; ५४ वर्षापासून सुरू आहे परंपरा
Fri, 26 May 2023

शेगांव ( ज्ञानेश्वर ताकोते पाटील:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) गण गण गणात बोते जय हरी विठ्ठल च्या गजरात श्रींचा ५४ व्या पालखी सोहळ्याचे आज दिनांक २६ मे रोजी सकाळी सात वाजता पंढरपूरकरीता प्रस्थान झाले आहे त्यामधे हजारो वारकऱ्यांनी सहभाग होता.
विदर्भातील पंढरी म्हणून परिचित असलेल्या शेगांव नगरीतून आज सकाळी ७ वाजता पैदल वारीचे आषाढी एकादशी साठी पंढरपूर कडे प्रस्थान झाले आहे. परंपरेनुसार सकाळी श्रींच्या पालखीचे पूजन करण्यात आले . पालखी २७ जून रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पोहचणार आहे. ५५० किलोमीटरचा हा प्रवास महिनाभराच्या कालावधीत पूर्ण होईल. संत नगरीतील असंख्य भाविक भक्तांनी हा सोहळा याची देही डोळा अनुभवला.