शेगावात दासहरिगणू निधी सोसायटीच्या दिनदर्शिकाचे विमोचन ! दर्जेदार आहे दिनदर्शिका
Dec 22, 2023, 19:01 IST
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेगाव येथील दासहरिगणू निधी सोसायटीचे नवीन वर्षाचे दिनदर्शिका पत्र प्रसिद्ध झाले आहे. त्याचे विमोचन आज २२ डिसेंबर रोजी संस्थेच्या शेगांव कार्यालयात करण्यात आले.
याप्रसंगी अकोला अर्बन निधी लिमीटेडचे अध्यक्ष सुभाष इंटनारे, व्यवस्थापक उध्दव इटनारे, दासहरिगणू निधी लिमीटेडचे अध्यक्ष गजानन विश्वनायराव फाळके, मॅनेजिंग डायरेक्टर विलास गजाननराव फाळके, तसेच पॅनलचे ॲड.निवृत्ती बोरसे, लोकमतचे तालुका प्रतिनीधी अनिल उंबरकार, तसेच सहयोग मल्टीस्टेटचे व्यवस्थापक अमोल भारंबे, क्षेत्रीय व्यवस्थापक सुनिल डोरे,मार्केटींग ऑफीसर विलास केंगारकर हे उपस्थिती होते.यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार मॅनेजिग डायरेक्टर विलास फाळके यांनी केला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी,पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.