CRIME STORY बाईने बाईसोबत असं करावं का? अपार्टमेंटमधील फ्लॅट मध्ये चालू होते काळे धंदे! "ती" बायांना आणायची अन् पैशांच्या बदल्यात पोरांच्या हवाली करायची!

खामगावात नवनियुक्त ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांची दणकेबाज कारवाई! दोन पीडित महिलांची केली सुटका; दोन तरुण "ऑनलाईन" पकडले! आईच्या वयाच्या महिलांसोबत करीत होते पाप..! खामगावात खळबळ..

 

खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बाईला बाईच्या वेदना कळतात असं म्हणतात..पुरुष तरी महिलांसोबत क्रूर पद्धतीने वागतील पण महिला तस करणार नाही असा समज आहे..मात्र खामगावची घटना वाचून तुमचा हा गैरसमज दूर होईल.. खामगावात एका बाईचा काळा कारनामा उघडकीस आला आहे..३७ वर्षाची ही बाई आहे..तिने एका अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला आणि त्यातच तिने काळा धंदा सुरू केला..गरीब महिलांच्या असहायतेचा फायदा घेत ती महिलांना फ्लॅटवर आणायची आणि त्यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घ्यायची..दोन दिवसांपूर्वी खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदाचा नव्याने पदभार स्वीकारलेल्या नरेंद्र ठाकरेंना याबद्दलची माहिती मिळाली अन लागलीच त्यांनी छापेमारी करून ह्या धंद्याचा पर्दाफाश केला. याप्रकरणी व्यवसाय करून घेणाऱ्या त्या महीलेसह दोन ग्राहक तरुणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून त्यांच्या ताब्यातून दोन पीडित महिलांची सुटका केली आहे. एका पीडित महिलेचे वय ३६ तर दुसरीचे वय ५० आहे..

प्राप्त माहितीनुसार खामगाव शहरातील जलंब नाका परिसरातील एका अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये अवैधरित्या देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. हा फ्लॅट एका सज्जन गृहस्थाच्या मालकीचा असला तरी त्यांनी तो फ्लॅट तुळसाबाई विनोद भुईभार (३७) हिला राहण्यासाठी भाड्याने दिला होता. ही महिला त्या फ्लॅट मध्ये राहत होती, तिथेच तिने अवैध देहविक्रीचा "हायटेक" व्यवसाय उभारला होता. फ्लॅटची भाडेकरू महिला गोरगरीब महिलांच्या असहायतेचा फायदा घेत त्यांच्याकडून फ्लॅट मध्ये देहविक्री करून घेत पैसा कमावत होती. अनेक आंबटशौकीन पुरुष वासनेची भूक भागवण्यासाठी पैसे मोजून त्या फ्लॅटवर जायचे. सध्याचा ऑनलाईनचा जमाना ओळखून फ्लॅटच्या भाडेकरू महिलेने पैसे स्विकारण्यासाठी क्युआर कोड ची देखील व्यवस्था करून ठेवली होती..
अन् पर्दाफाश झाला...
दोन दिवसाआधी दबंग अधिकारी म्हणून लौकिक मिळवलेल्या नरेंद्र ठाकरे यांनी खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदाची सूत्रे स्वीकारली, तेव्हाच नंबर दोन वाल्यांचे धाबे दणाणले होते. जलंब नाक्यावरील या अवैध देहविक्री धंद्याची खबर गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर स्वतः ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वात सापळा रचण्यात आला. पोलिसांनी आधी एक डमी ग्राहक पाठवून मिळालेल्या गोपनीय माहितीची खात्री केली. काळा धंदा सुरू असल्याची खात्री होताच छापेमारी करण्यात आली. यावेळी दोन ग्राहक "ऑनलाईन" होते. पोलिसांनी फ्लॅटच्या भाडेकरू महिलेच्या ताब्यातून दोन मोबाईल, रोख ७३९० रुपये, क्युआर कोड व कंडोम सह इतर वस्तू असा २४ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर याचवेळी तिथे आलेल्या दोन ग्राहक तरुणांकडून दोन मोबाईल व प्रत्येक ५ हजार रोख असे १० हजार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. खामगाव शहर पोलीस ठाण्यात अवैध देहविक्री करून घेणारी भाडेकरू महिला व दोन ग्राहक तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका केली. खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वात खामगाव शहर पोलिसांनी ही कारवाई केली.
  आईच्या वयाच्या महिलेसोबत पाप...?
 दरम्यान या घटनेतून अनेक धक्कादायक बाबी उजेडात आल्या आहेत. पोलिसांनी ज्या दोन ग्राहकांना पकडले त्यांचे वय एकाचे २२ तर दुसऱ्याचे २५ आहे. नुकत्याच तारुण्यात आलेल्या या मुलांनी शारीरिक भूक भागवण्यासाठी वाममार्गाचा अवलंब केला. विशेष म्हणजे ज्या पीडित महिलांची सुटका पोलिसांनी केली त्यांचे वय एकीचे ३६ तर दुसरीचे ५० आहे. आपल्या वयापेक्षा दुप्पट वय असलेल्या, आईच्या वयाच्या महिलांसोबत त्यांच्या असहायतेचा फायदा घेत त्या तरुणांनी पापी कृत्य केले..
ये तो ट्रेलर है...
संवेदनशील शहर म्हणून ओळख असणाऱ्या खामगावसाठी एसपी सुनील कडासने खमक्या अधिकाऱ्याच्या शोधात होते. नरेंद्र ठाकरेंवर ती जबाबदारी सोपवण्यात आली.. पदभार स्वीकारताच नरेंद्र ठाकरे यांनी ट्रेलर दाखवला..हा ट्रेलर पाहूनच अनेकांचे धाबे दणाणले आहेत एवढे नक्की...!