BIG BREAKING शेगावात धनदांडग्यांच्या अड्ड्यावर छापा! मोठे घबाड हाती; प्रतिष्टितांना पाप करतांना रंगेहाथ पकडले

 
hfkjdfjks
शेगावात(ज्ञानेश्वर ताकोते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेगाव तालुक्यातून मोठी बातमी समोर येत आहेत. शेगाव वरवट रोडवरील गौरव धाब्यावर पोलिसांकडून छापेमारी करण्यात आल्याचे वृत्त असून एका विशेष पोलिस पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. अमरावती वरून या कारवाईची सूत्रे हलल्याचे समजते.
 

जवळपास ५० जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले.  मोबाईल, चारचाकी, दुचाकी आणि रोख रक्कम असा जवळपास दोन कोटींचा मुद्देमाल हस्तगत गेल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पंचनामा सुरू असल्याने नेमकी रक्कम आणि आरोपींची संख्या कळू शकली नाही. मात्र असे असले तरी जिल्ह्यातील ही घबाड कारवाई असल्याचे सूत्रांकडून समजते. यासंदर्भातील अपडेट आपल्याला बुलडाणा लाइव्ह वर वाचायला मिळतील.