BIG BREAKING खामगाव तालुक्यातील रोहणा गावात ढिशक्यांव ढिशक्यांव! दोन गटातील वादात गोळीबार; एक ठार, दोघे गंभीर! जिल्हा हादरला....

 
Hdhdb
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव बुलडाणा रस्त्यावरील रोहणा गावात आज एकाच जातीच्या दोन गटात तुंबळ वाद झाला. यावेळी झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे खामगाव तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाल्याने गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
Dhanik
                जाहिरात 👆
या घटनेचा विस्तृत तपशील मिळू शकला नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार गावालगत पारधी समाजाची राहुटी आहे. तिथे आज गुरुवारी पारधी समाजाचेच काही व्यक्ती आले. या दोन्ही गटात गंभीर कारणावरून कडाक्याच्या वाद झाला. वाद टोकाला गेल्याने एका गटातील तिघांनी दुसऱ्या गटातील व्यक्तींवर बेछूट गोळीबार केला. गोळीबारात एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींवर खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. अवैध शस्त्र खरेदी विक्रीच्या व्यवहारातून वाद झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. मात्र याला पुष्टी मिळाली नाही.