BIG BREKING! खामगावात तणाव; भिमजयंती निमित्त लागलेल्या पोस्टरवर अज्ञात भामट्याने चिखल फेकला;तीन तासांपासून रास्तारोको
Apr 21, 2023, 10:02 IST
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देशात राहून देशातील महापुरुषांच्या विचारांशी प्रतारणा करणारे भामटे अनेकदा कुरापत्या करीत असतात. असेच एका कुरापतखर खोराने खामगाव तालुक्यातील घाटपुरी येथे विकृतपणा केला.
भिमजयंती निमित्त लागलेल्या पोस्टरवर भामट्याने चिखल फेकला. ही बाब लक्षात येताच तणाव निर्माण झालाय. अज्ञात समाजकंटकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. गेल्या तीन तासांपासून महिलांनी रास्तारोको केलाय. घाटपुरी ग्रामपंचायत जवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त हे शुभेच्छा बॅनर लावण्यात आले होते. रात्री दरम्यान कुण्यातरी अज्ञात भामट्याने बॅनर वर चिखल फेकला. हा प्रकार लक्षात येताच ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. महिलांनी सकाळपासून घाटपुरी बायपास रोखला. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या नेतृत्वात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.