भाजपतर्फे जिल्ह्यात २६, २७ ऑक्टोबरला आसूड मोर्चा!
Oct 23, 2021, 11:07 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला असून, आसूड मोर्चा काढून शेतकऱ्यांच्या भावना राज्य सरकारपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.
२६ ऑक्टोबरला खामगाव, जळगाव जामोद, चिखली, मलकापूर आणि २७ ऑक्टोबरला बुलडाणा, मेहकर, सिंदखेड राजा येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. पीक विम्याची रक्कम ज्या शेतकऱ्यांना मिळाली तीही तुटपुंजी असून, शेतकऱ्यांची थट्टा करण्यात आली आहे. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे, असे भाजपतर्फे देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मोर्चात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.