शेतकऱ्यांना मुळ किमतीपेक्षा जास्त भावाने सोयाबीन बियाण्याची विक्री करणाऱ्या खामगावच्या 'अंकुर कृषी केंद्राचा' परवाना अखेर रद्द!जिल्हा कृषी अधिकारी यांची कारवाई..!
१ जुलै रोजी जिल्हा कृषी अधिकारी बुलढाणा यांनी अंकुर कृषी केंद्राचा परवाना पुढील आदेशापर्यन्त निलंबित केला आहे.
अंकुर कृषी केंद्र (सरकी लाईन खामगाव) येथे सोयाबीनच्या दोन बॅगची खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याला ३ हजार ६०० रुपयांची बिल दिले होते, मात्र त्या शेतकऱ्याजवळून प्रत्यक्ष ४ हजार २०० रुपये घेण्यात आले होते.
पिंटू लोखंडकार (रा. नागापूर तालुका खामगाव) असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. याप्रकरणी माहिती मिळताच खामगाव तालुका कृषी अधिकारी भाग्यश्री देसले यांनी अंकुर कृषी केंद्रावर पोहचून पंचनामा केला होता. अंकुर कृषी केंद्र चालकार कारवाई प्रस्तावित होती.अखेर १ जुलै रोजी तपासणी पूर्ण झाल्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी यांनी अंकुर कृषी केंद्राचे मालक अंकुश अग्रवाल याचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे.
असा फसवणुकीचा प्रकार कोणत्याही शेतकऱ्यांसोबत घडल्यास त्याने कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी खामगाव यांनी केले आहे.