'बालविकास प्रकल्प'ला अंगणवाडी सेविकांचा घेराव! जळगाव येथे आक्रमक आंदोलन; १५ डिसेंबरला विधानभवनावर धडकणार...

 
Bxnxnx
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यातील अंगणवाडी सेविकांनी प्रलंबित मागण्यासाठी ४ डिसेंबर पासून बेमुदत संप पुकारला आहे. आज या अंतर्गत जळगाव जामोद येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यलयाला घेराव करण्यात आला.  
केवळ संप पुकारून घरी बसण्याऐवजी रस्त्यावर संघर्ष करण्याच्या निर्धाराने जिल्हाध्यक्ष कॉ. पंजाब गायकवाड यांच्या नेतृत्वात आंदोलन करून निदर्शने करण्यात आली. सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा, २६ हजार किमान वेतन, पेंशन, ग्रॅज्यूटी, आणि सामाजिक सुरक्षा या प्रमुख मागण्यासाठी गेल्या ४८ वर्षा पासून लढा सुरू आहे. आंदोलनात जिल्हा सचिव प्रतिभा पाटील, तालुका अध्यक्ष विजया शेळके, लक्ष्मी गवई, सविता चोपडे, बेबी दाते, प्रविणा बगाडे, तारा शर्मा, छाया अवसरमोल, कल्पना घाईट यासह शेकडो अंगणवाडी सेविका, मदतनीस सहभागी झाल्या .
१५ ला अधिवेशनावर मोर्चा
या आंदोलनाची सरकारने दखल घेतली नाही तर १५ डिसेंबर रोजी नागपूर अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. मागण्यांवर सरकार लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत संप सूरूच राहिल असा इशारा ,सीटूचे जिल्हा अध्यक्ष कॉ. पंजाब गायकवाड यांनी यावेळी बोलताना दिला.