चिखलीत सर्वपक्षीय हिंदू नेते एसडीपीओंना भेटले! ठाणेदार भूषण गावंडेंच्या निलंबनाची मागणी; टिपू सुलतान चौकाचा फलक हटवण्याचीही मागणी!
दंगा काबू पथकात असलेल्या सैलानी नगरातील रहिवासी असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने विलास घोलप यांना जाणीवपूर्वक मारहाण केली. हिंदू मुलांना घरातून ओढून या पोलिस कर्मचाऱ्याने मारले असे निवेदनात म्हटले आहे. अशा घटना वारंवार घडण्यास कारणीभूत ठरत असलेला टिपू सुलतान चौकाचा फलक काढण्यात यावा, चिखलीचे ठाणेदार भूषण गावंडे यांना निलंबित करावे अशा मागण्याही या निवेदनात आहेत.
पाकिस्तान जिंदाबाद चे नारे देणाऱ्यांना शोधावे व त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. जाबुवंती नदीच्या पुलापासून तर साकेगाव रोडवरील अनुराधा कॉलेज पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण काढण्यात यावे. या घटनेशी संबंध नसलेल्या निर्दोष व्यक्तीवरील गुन्हे मागे घेण्यात यावे असेही निवेदनात नमूद आहे. निवेदनावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख शिवाजी देशमुख, भाजप शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, दत्ता खरात, गजानन मांटे, गणेश बरबडे, अर्जुनराव नेमाडे शिवसेना तालुकाप्रमुख गजानन मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत..
पुरावे द्या सोडणार नाही..!
दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांनी परिस्थिवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. घटनेशी संबंधित लोकांना अटक केली आहे, काहींना अटक करण्यात येत आहे. सध्या शांतता आहे मात्र शांतता भंग करण्याचा प्रयत्न कुणी करू नये. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. काही लोकांनी देशविरोधी घोषणा दिल्या असा आरोप होतोय,यासंबधी कुणाकडे काही पुरावे, व्हिडिओ क्लिप असतील तर ते पोलिसांकडे द्यावे. माहिती देणाऱ्याचे नाव पोलिसांकडून गुपित ठेवण्यात येईल. जरच खरचं देशविरोधी घोषणा दिल्याचे समोर आले तर त्यांना सोडणार नाही असे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम म्हणाले.