बोरी - अडगावातल्या मनकामनेश्वर मंदिरात उद्या अखंड शिवलिंग महाअभिषेक सोहळ्याची सांगता! शिव कथाकार प्रदिप मिश्रांनी सिध्द केलेल्या 'एक लाख एकवीस हजार' रुद्राक्षाचे होणार भक्तांना वाटप!

 
Ggjk
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पवित्र श्रावण मासानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही बोरी - अडगाव (ता - खामगाव) येथे श्री मनकामेश्वर महादेव मंदिर याठिकाणी महिनाभर अखंड शिवलिंग महाअभिषेक सोहळा उज्जैन येथील ब्राह्मण वृदांच्या हस्ते पार पडत आहे. या सोहळ्याची सांगता उद्या दिनांक १६ सप्टेंबर रोजी होणार आहे. याठिकाणी एक लाख अकरा हजार एकशे अकरा, मातीचे लिंग तयार करून त्याची पूजा करून महाआरती झाल्यानंतर दररोज एक लाख अकरा हजार एकशे अकरा मातीच्या लिंगाचे विसर्जन केल्या जात होते. 
शिव महाराज वामन पाटील ह. मु. इंदोर यांच्या वतीने प्रसिद्ध शिव कथाकार श्री प्रदीपजी मिश्रा सीहोर यांनी सिद्ध केलेले एक लाख एकवीस हजार रुद्राक्ष वाटपही करण्यात येणार आहेत. उद्या सकाळी ४ वाजता भस्माआरती होणार आहे. त्यानंतर सकाळी ६ ते १० या वेळात होम - हवन महाभिषेक आदी कार्यक्रम होणार आहेत. सकाळी ११ वाजता पासून महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे.सर्वांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.