आई-वडिलांच्या भेटीनंतर पतीसह निघाली घरी पण रस्त्यात भरधाव वेगाने धडकली मालवाहू गाडी !

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) आई-वडिलांच्या भेटीनंतर पतीसह घरी जात असताना मालवाहू बोलेरो पिकपने धडक देवून पतीला जखमी केले व मोटरसायकलचे नुकसान केले. अशी तक्रार रविवारी, खामगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली. यावरून पोलिसांनी, मालवाहू चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
   शनिवार, २४ जून रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास कांचन ढाबा परिसरात ही घटना घडली. ३० वर्षीय विवाहिता योगिता महाले आपल्या आई वडिलांना भेटण्याकरीता माहेरी घाटपुरी येथे गेली होती. भेट घेऊन जेवण झाल्यानंतर, रात्री पतीसह विवाहिता घराकडे निघाली. आपल्या दुचाकीने दोघे घरी चालले होते. दरम्यान, एमएच. ४ एच वाय. ०७४६ क्रमांकाच्या मालवाहू बोलेरो पिकपने भरधाव वेगात धडक दिली. यात महाले यांची मोटरसायकल उलटली. मोटार सायकलचे नुकसान झाले असून पतीला मार लागला आहे. निष्काळजीपणाने वाहन चालून जखमी केले आणि गाडीचे नुकसान केले असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून, पोलिसांनी अज्ञात चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.