शेगावात ३० वर्षानंतर दहावीचे विध्यार्थी एकत्र जमले! १९९४ सालच्या बॅचच्या आठवणींना उजाळा!

 
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा: संतोष देठे) माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा २८ जानेवारीला शेगाव तालुक्यातील माटरगावात पार पडला. यात तब्बल ३० वर्षानंतर जिल्हा परिषद शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांची भेट घडली.. ते म्हणजे, १९९४ सालची बॅच पुन्हा एकत्र जमली. आणि अनेकानेक आठवणींना उजाळा मिळाला. 
  स्नेहसंमेलन कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने करण्यात आली. शाळेच्या प्रांगणात राष्ट्रगीत झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रसाळ सर होते.तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक पवार, कुळकर्णी होते. कार्यक्रमात १९९४ सालच्या अनेक आठवणी , किस्से उलगडले. त्या विद्यार्थ्यांना संत गजानन महाराजांची मूर्ती भेट देण्यात आली. दरम्यान कल्पना खंडेराव,शेषराव खंडेराव यांनी गायनकला प्रस्तुत केली. सदर कार्यक्रमासाठी मुंबई,पुणे, वर्धा ,नागपूर येथून माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.