BREAKING संग्रामपूरात तुफान! घरावरील टिनपत्रे उडाली, केळी अक्षरशः झोपली..

 
संग्रामपूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा बरेच नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी अवकाळीचा तडाखा बसत असताना आज संग्रामपूर तालुक्यातील पळसोडा परिसराला अवकाळीचा मोठा झटका बसला. आज सायंकाळच्या सुमारास सोसाट्याच्या वारा सुटला , वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने अनेक घरांवरील टिनपत्रे उडाली आहेत. परिसरात असलेल्या शेतकऱ्याने देखील मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे केळी पीक अक्षरशः झोपले आहे. यासंदर्भात तातडीने पंचनामे करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.