शेगावमध्ये दिसला लाखात एक दुर्मिळ साप..!

सर्पमित्रांनी सुरक्षितस्थळी सोडले
 
snake
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पांढऱ्या दुर्मिळ सापाला पकडून सर्पमित्रांनी जीवनदान दिले. १४ नोव्हेंबर रोजी सर्पमित्र देव निंबाळकर व त्यांच्या टीमने या दुर्मिळ सापाला पकडून सुरक्षितरित्या जंगलात सोडून दिले. वनविभागाचे वनपाल दीपक शेगोकार यांच्याकडे साप आढळल्याची नोंद करण्यात आली आहे.
सर्पमित्र देव निंबाळकर यांनी या दुर्मिळ सापाबद्दल माहिती देताना सांगितले, की महाराष्ट्रात या सापाबद्दल खूप अंधश्रद्धा आहेत. अतिशय दुर्मिळ असणारा हा साप कुकरी या जातीचा असून तो निशाचर म्हणजेच रात्री शिकार करणारा आहे. अशा सापांचा जन्मदर लाखात एक असतो. निसर्गाशी एकरूप होत नसल्याने हे साप त्यांच्या शत्रूंच्या लवकर निदर्शनास येतात व ते मारले जातात. त्यामुळे हा अतिशय दुर्मिळ साप आहे. वनविभागाचे वनपाल दीपक शेगोकार यांच्याकडे साप आढळल्याबाबतची नोंद करण्यात आल्याची माहिती सर्पमित्र देव निंबाळकर, करण ठाकूर यांनी दिली.